शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कामटेसह सहाजणांच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:07 IST

सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजणांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची वाढ केली. गुन्ह्यातील दोरी, संशयितांचे मोबाईल व दुचाकी जप्त करायची असून, अमोल भंडारेला कृष्णा नदीच्या घाटावर घेऊन बसलेल्या दोन संशयितांचा शोध घ्यायचा असल्याने, ‘सीआयडी’ने कोठडी वाढवून घेतली.सांगली शहर पोलिसांनी ...

सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजणांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची वाढ केली. गुन्ह्यातील दोरी, संशयितांचे मोबाईल व दुचाकी जप्त करायची असून, अमोल भंडारेला कृष्णा नदीच्या घाटावर घेऊन बसलेल्या दोन संशयितांचा शोध घ्यायचा असल्याने, ‘सीआयडी’ने कोठडी वाढवून घेतली.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला ‘थर्ड डिग्री’चा वापर करून बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जंगलात जाळला होता. याप्रकरणी युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी सकाळी अकरा वाजता त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. पी. खापे यांच्या न्यायालयात उभे केले होते. सरकारतर्फे अ‍ॅड. उज्ज्वला आवटे, ‘सीआयडी’चे पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. संशयितांपैकी कोणीही अजून वकील दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यातर्फे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अ‍ॅड. आर. पी. पाटील यांनी बाजू मांडली.अ‍ॅड. उज्ज्वला आवटे, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, अनिकेतवर ‘थर्ड डिग्री’ वापरताना त्याला उलटा टांगण्यासाठी वापरलेली दोरी जप्त करायची आहे. संशयितांनी गुन्ह्यात चार वाहनांचा वापर केला आहे. त्यापैकी तीन वाहने जप्त केली आहेत. अजूनही एक दुचाकी जप्त करायची आहे. त्यांचे मोबाईलही जप्त करायचे आहेत. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी काहीजणांना मोबाईलवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आहे. हे लोक कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलचे ‘कॉल डिटेल्स’ काढावे लागणार आहेत. ‘कॉल डिटेल्स’ काढून संबंधितांना चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. कामटेच्या नखांचे नमुने तपासणीसाठी घ्यायचे आहेत, यासाठी संशयितांच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करावी. अ‍ॅड. आर. पी. पाटील यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, संशयितांना १३ दिवसांची कोठडी दिली होती. तपासाला हा कालावधी पुरेसा होता. त्यामुळे आणखी कोठडीची गरज नाही. न्यायाधीश पी. पी. खापे यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून कामटेसह सहाजणांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.

टॅग्स :Crimeगुन्हा